दी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबईची 63 वी वार्षिक सभा संपन्न
दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॅार्पोरेशन लि. मुंबईची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दुपारी २ वाजता आंध्रा भवन, दादर येथे पार पडली. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर या बैठकीस हजर राहून सहकार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, उपाध्यक्ष सानप, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी मंत्री आणि फेडरेशनचे संचालक सतीशअण्णा पाटील यांसह फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक आणि सभासद उपस्थित होते.