यवतमाळ: अत्याचारात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एका वारसाला नोकरी ; जिल्ह्यात 55 प्रकरणांचा समावेश
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील सन 2012 ते 2025 या काळातील एकुण 55 प्रकरणांचा समावेश असून, केवळ 28 प्रकरणी प्रस्ताव प्राप्त आहेत. उर्वरित प्रकरणांत पात्र वारसांनी दस्तऐवज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.