औसा शहरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर बेकायदेशीररीत्या लॉजिंगच्या नावाखाली अवैध व्यवसाया सुरू आहे. या लॉजवर कारवाई करून बंदी घालावी, अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली. दरम्यान, तक्रारदार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी शनिवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते ते आज लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.