मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार? - भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार.? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. अशी टीका आज रविवारी दुपारी १ वाजता भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली आहे.