रामटेक: वाघाच्या हल्ल्यात ठार अशोक उईकेच्या घरी खासदार शामकुमार बर्वे यांची सांत्वना भेट
Ramtek, Nagpur | Dec 7, 2025 पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र वन्यजीव एक संघ नियंत्रण पवनी अंतर्गत मौदी गावाजवळील जंगल शिवारात शुक्रवार दिनांक पाच डिसेंबरला सायंकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर अशोक उईके ठार झाल्याची घटना समोर आली होती. त्याचे शव छिन्न विछिन्न अवस्थेत सापडल्यानंतर परिसरात संतापाची लाट होती. या दरम्यान शनिवार दिनांक ६ डिसेंबरला दुपारी रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे यांनी मौदी येथे येऊन मृतक अशोक उइके यांच्या घरी भेट देऊन परिवाराची सांत्वना केली.