नाशिक: शहरातील कृषी विभागाच्या आवारात रानभाजी महोत्सवाला प्रारंभ, मंत्री कोकाटे, मंत्री भुसे व मंत्री झिरवाळ यांची उपस्थिती
Nashik, Nashik | Aug 3, 2025 कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिक आणि प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्र या उपक्रमास आज रविवार दि. 3 रोजी दुपारी तीन वाजता नाशिक शहरातील कृषी विभागाच्या आवारात प्रारंभ झाला. राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार हिरामण कुस्कर यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.