महागाव येथे तालुकास्तरीय अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थिती दर्शविली. या महोत्सवामध्ये विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजयी चमूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.