खंडाळा येथील शेतकरी विजय सांगुनवेढे यांची खंडाळा शिवारात शेती असून त्यांनी संत्रा झाडाची १० वर्षांपूर्वी लागवड केली आहे. २७ मार्चच्या रात्री कुणीतरी अज्ञाताने त्यांची संत्र्याची ६ झाडे व फळधारणा झालेले १ आंब्याचे झाड तोडले आहे. याप्रकरणी विजय सांगुनवेढे यांनी २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता हिवरखेड पोलिसांत तक्रार दिली. हिवरखेड पोलीस तपास करीत आहेत.