अर्जुनी मोरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य परिणयजी फुके, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, ज्येष्ठ नेते लुलकरणजी चितलांगे, न. पं. अर्जुनी मोर नगराध्यक्षा मंजुषाताई बारसागडे, उपनगराध्यक्षा ललिताताई टेंभरे, कृ.उ.बा.स. संचालिका शारदाताई बडोले, माजी जि. प. उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर, आदी मान्यवर या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.