राळेगाव तालुक्यात गोपालनगर परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह जिल्हा प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबविले. दिनांक २३ डिसेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दोन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार होते. अंगणवाडी सेविकेकडील नोंदींच्या आधारे दोन्ही बालकांचे वय १६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले.