चाळीसगावः प्रतिनिधी प्रत्येकाला हक्काचा निवारा मिळावा, या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेला चाळीसगाव तालुक्यात निधीच्या तुटवड्यामुळे ब्रेक लागला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या अनेक घरकुलांचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने, लाभार्थ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असून अनेक घरांची कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत.