दारव्हा तालुक्यातील हरू येथील ग्राम विविध सहकारी सोसायटीतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधीपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. राहुल माणिकरावजी ठाकरे यांची दि. २३ डिसेंबरला सकाळी ११ वा. झालेल्या सभेत अविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या कार्यालयात पार पडलेल्या निवड प्रक्रियेत कोणताही विरोधी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड सर्वानुमते जाहीर केली.