यवतमाळ शहरातील शुभम कॉलनी येथे राहणारे अमोल भोयर हे परिवारासह कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून सोने चांदीचे वेगवेगळे दागिनेसह रोख रक्कम असा एकूण 64 हजार 480 रुपयाच्या मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी 20 डिसेंबर रोजी लोहारा पोलीस ठाणे मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.