तालुक्यातील विठोली (बोरगाव) शेतशिवारातील महिला शेतकरी अर्चना इंगळे यांच्या शेतातील दोन एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना रविवारी (ता. १४) सकाळी उघडकीस आली. तालुक्यातील शेतकरी आधीच नापिकी व अतिवृष्टीने संकटात सापडले आहेत. त्यातच एकापाठोपाठ एक संकटे त्यांच्यावर येत आहेत. विठोली (बोरगाव) येथील महिला शेतकरी अर्चना पुरुषोत्तम इंगळे यांच्या दोन एकर शेतातील परिपक्व झालेला ऊस जळून खाक झाला. ही आग शॉट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. आधीच अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला ग