कामठी: भाजपा उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करून घेत असल्याचा खळबळ जनक आरोप ; फार्म हाऊस वर मिळाले पुरावे
नागपूर कामठी रोड वर आशा हॉस्पिटलच्या जवळ सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे. कामठी चे भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करून घेत असल्याचा आरोप माजी मंत्री एडवोकेट सुरेखाताई कुंभारे यांनी केला आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे या कार्यवाहीत बनावट वोटर आयडी आणि बोटावर शाही मिटवण्याचे द्रव्य आढळून आले आहे या फार्म हाऊस वर बनावट व्होटर कार्ड व बोगस मतदार आढळून आल्याचा आरोप आहे.