अंबरनाथ: बदलापूर येथे पुन्हा पैसे वाटल्याचा प्रकार उघडकीस
बदलापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापूर शहरात पुन्हा एकदा पैसे वाटण्याचा प्रकार आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास उघडकीस आला आहे. भाजपाचे भरत नवगिरे यांच्या प्रभागात हा प्रकार घडला असून सध्या पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत व कारवाई सुरू केलेली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील अजित पवार गटाकडून पैसे वाटण्याचा प्रकार उघडकीस आला होता व शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडलं होतं.