पूर्णा तालुक्यातील मोजे अजतापूर शिवारातील पूर्णा नदीपात्रात अज्ञात चोरट्यांनी तब्बल 40 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना जोडलेल्या विजेच्या केबलची मोठी चोरी केल्याची घटना ४ डिसेंबरच्या मध्यरात्री घडली असून शेतकऱ्यांनी चुडावा पोलीस ठाण्यात आज शनिवार 6 डिसेंबर रोजी तक्रार नोंदवली आहे. पूर्णा नदीपात्रात अनेक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी कृषी पंप बसवले आहेत.