विठ्ठलवाडी व बावडा (ता.इंदापूर) येथील बागल फाटा येथे पहाटेच्या सुमारास 3 ते 4 चोरटे घरात घुसून वृद्ध महिला व त्यांच्या नातेवाइकांवर मारहाण करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व टीव्ही, असा सुमारे एक लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.या प्रकरणी इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.