इंदापूर तालुक्यातील विविध भागात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या वादळवारा आणि अवकाळीनं नुकसान झालयं.बिजवडी नजीक च्या अभंगवस्तीवर देविदास जगन्नाथ यादव यांचे अवकाळीने शेती पिकांसह राहत्या घराचे प्रचंड नुकसान झालेय.तर काळखे वस्तीवरील रोहिदास बाळू चोरमले यांची तीन एकर केळी ही अक्षरश: जमिनीवर आडवी झालीय.