कल्याण पूर्व पश्चिम उल्हासनगरला जोडणारा वालधुनी पूल आजपासून 20 दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भात आज दिनांक 20 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास कल्याण वाहतूक विभागाचे पोलिस सहायक आयुक्त किरण बालवडकर यांनी माहिती दिली आहे. या पुलावर 10 जानेवारी पर्यंत डांबरीकरण आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.