नागपूर शहर: विघ्नहर्ता अपार्टमेंट येथे अज्ञात आरोपीने घरफोडी करून एक लाख 5 हजार रुपयांचा माल नेला चोरून
दोन डिसेंबरला सायंकाळी 6:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन गिट्टीखदान हद्दीतील विघ्नहर्ता अपार्टमेंट येथे राहणारे अतुल देशपांडे हे घराला कुलूप लावून घराच्या टेरेसवर गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करून अवघ्या अर्ध्या तासात रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकारनी प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे