परळी तालुक्यातील धर्मापुरी रोडवर, चाकूचा धाक दाखवून प्रेमचंद पवार या युवकास लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणात चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पंकज तुकाराम उगलमुगले (25), रा. पांगरी, वैभव राम बिडगर (20), रा. दाऊतपूर, श्यामसुंदर बालासाहेब फड (20), रा. मरळवाडी, आदित्य सुरेश उपाडे (20), रा. सिद्धार्थ नगर अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने, सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता परळी शहरातून या आरोपींना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून सोन्याची चैन, दोन अंगठ्या,