पारोळा: पारोळ्यात सरळ लढतीची शक्यता
Parola, Jalgaon | Nov 17, 2025 पारोळा : येथील नगर परिषदेच्या २४ नगरसेवकांबरोबरच लोकनियुक्त लढत नगराध्यक्ष पदासाठीची अटीतटीची, चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ही आमने-सामने सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिंदेसेना यांची युती झाली आहे. येथील नगराध्यक्ष पदाची जागा शिंदेसेनेला सोडण्यात आली आहे. त्यामुळे येथे शिंदेसेनेचा उमेदवार रिंगणात उतरणार आहे. शिंदेसेनेबरोबर यावेळी भाजप असल्याने शिंदेसेनेचे बळ वाढल्याचे बोलले जात आहे.