पुणे शहर: बावधन परिसरात ऑटो रिक्षाचा भीषण अपघात, चालकाचे पाय अडकले
Pune City, Pune | Jul 21, 2025 पुणे: बावधनहून वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वेदविहार समोरील दुभाजकावर ऑटोरिक्षाचा भीषण अपघात झाला. ऑटोरिक्षा दुभाजकाला धडकल्याने चालकाचे दोन्ही पाय अडकले आणि तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून चालकाचे अडकलेले पाय काढले आणि त्याला रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.