दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे जिल्हा परिषद कार्यालय गोंदिया येथे जात असताना नवेगाव बांध येथील शिवाजी चौक, बावनकरजी यांच्या टी. सेंटर येथे थांबून त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. या चर्चेदरम्यान परिसरातील विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण तसेच स्थानिक समस्या व नागरिकांच्या अपेक्षा यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात करून नागरिकांनी मांडलेल्या अडचणी आणि सूचनांकडे लक्षपूर्वक ऐकून घेतले.