एकलव्य ज्ञानवर्धिनी बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या तर्फे घेण्यात येणारी एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल १ जानेवारी २०२५ ला घोषित झाला. त्यामध्ये सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट व जी.एम.बी. हायस्कूल येथील एकूण ९९ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी प्राविण्य प्राप्त विद्यार्थी , रियान योगेंद्र गौतम, आर्या कृष्णा फुल्लुके, अवंती एन. गायकवाड, सार्थक सुजित जक्कुलवार विधी रेशीम परशुरामकर, फाल्गुनी संतोष बागडे ठरले.