कोकणच्या मातीतील सण आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेला होळीचा सण साजरा करण्यासाठी सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पेण कोळीवाड्यात या उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोळी बांधवांनी यंदा तब्बल ४० फूट उंच होळी सजवून उभी केली असून, ही भव्य होळी पाहण्यासाठी आतापासूनच नागरिकांची मोठी गर्दी उसळत आहे. २ मार्च रोजी हुताशनी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या होळीचा मुख्य सोहळा पार पडणार असून पारंपरिक वेशभूषा, नाच आणि गाण्यांच्या जल्लोषात समाज बांधवांचे निखळ मनोरंजन केले जाणार आहे.