चोपडा: चोपडा येथील नगरपालिका कार्यालयासमोर मोटरसायकल चोरी, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Nov 18, 2025 चोपडा शहरात नगरपालिका कार्यालय आहे.या नगरपालिका कार्यालयाजवळ धम्मू सेनानी यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम. पी.४६ एम. एन.९४५२ ही लावली होती तेव्हा तेथून त्यांची ही मोटर सायकल कोणीतरी चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल मिळून आली नाही म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.