घनसावंगी: लोकसहभागातून गुरुपिंपरी शिवार पाणीदार करण्याचा निर्धार; नाला कामांना सुरुवात..
लोकसहभागातून गुरुपिंपरी शिवार पाणीदार करण्याचा निर्धार; नाला कामांना सुरुवात.. आज दिनांक 31 मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी गुरुपिंपरी शिवारात जलसंधारणाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांना उत्साहात प्रारंभ करण्यात आला. तहसीलदार रमेश पागोटे यांच्या हस्ते पोकलेन मशीनचे पूजन करून नारळ फोडत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी समस्त महाजन ट्रस्ट, मुंबईच्या विश्वस्त श्रीमती नूतन दीदी देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील