आज दिनांक 19 जानेवारी दुपारी 3 वाजता मनपा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आमदार संजय केणेकर यांनी शिवसेना नेते व मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरून “लोक श्रीमंत झाले, व्हाईट हाऊस बांधले” अशी बोचरी टीका केली होती. त्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युतीच्या चर्चेच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेचे नेते एकत्र आले आणि जुन्या टोमण्यांचा ‘चहा’ पुन्हा उकळला. बैठकीदरम्यान आमदार संजय केणेकर यांनी “चहा घ्या” अशी ऑफर दिली.