आमगाव: ५० हजारांच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचे अपहरण, जंगलात नेऊन केली बेदम मारहाण : चौघांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Dec 21, 2025 बँक खात्यात जमा झालेल्या रकमेच्या वसुलीसाठी शेतकऱ्याचे अपहरण करून त्याला कारमध्ये बसवून जंगलात नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ठाणा परिसरात घडली. याप्रकरणी दीड महिन्यानंतर आमगाव पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २०) गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. -- महेश अमरलाल मोहारे (३५, रा. कहाली–तिनटोली, ता. सा