अरुणोदय सिकलसेल मोहिमेच्या प्रभावी जनजागृती मुळे १ लाखाहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण भंडारा: सिकलसेल मुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने भंडारा जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे निर्मूलन व जनुकीय दोष रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाला भंडारा जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुंवर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीपकुमार गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृतीमुळे या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी यशस्वीरीत्