पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामधील मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने शनिवारी (ता. २8) १ कोटी ३० लाख किमतीची १ किलो ३८० ग्रॅम वजनाची व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्याऱ्या दोघांवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले.शुभम पद्माकर अडागळे (वय २३) आणि अक्षय वरणकरण (दोघेही रा. घोलप वस्ती, आळंदी-मरकळ, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहे.