कठोर मेहनत दृढ आत्मविश्वास जिद्द व चिकाटीच्या जोरावर शिवाजीनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या फळ विक्रेता निलेश भारसाखळे यांची मुलगी अक्षरा भारसाखळे हिची महाराष्ट्र राज्याच्या शालेय मुलीच्या हॉकी संघात निवड झाली.14 वर्षाआतील शालेय राज्य हॉकी स्पर्धेत या कौशल्यवंत हॉकीपटूची निवड राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य मुलीच्या संघात वर्णी लागली. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.