पाडे ता. दिंडोरी येथे अशोक केशव निसाळ गट नंबर 65 यांच्या विहिरीत पाण्यात बिबट्या पडलेला असल्याने त्यास तात्काळ वन कर्मचारी यांनी जागेवर पोचून विहिरीत पिंजरा टाकून स्थानिक शेतकरी तरुण यांच्या सहकार्याने सुरक्षित रित्या बाहेर काढले आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार त्यास वैद्यकीय तपासणीसाठी म्हसरूळ, नाशिक येथील उपचार केंद्रात रवाना करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.