बदलापूर येथे 2 डिसेंबर रोजी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. मात्र काही प्रभागांमध्ये निवडणुका प्रलंबित ठेवल्या होत्या. त्या प्रभागातला निवडणुका आज पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर बदलापूर येथील एका 96 वर्षाच्या आजींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. चंद्रभागा असे या आजींचे नाव असून मतदानानंतर आजींनी आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.