स्थानिक शासकीय विश्रामगृहातील सभागृहात लोकहित बहुजन पत्रकार संघाची अधिकृत स्थापना दि. ६ जानेवारीला करण्यात आली. शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या एकजुटीसाठी तसेच बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.