धुळे: चाळीसगाव चौफुली परिसरात स्वतंत्र चौफुलीसाठी राष्ट्रवादी आणि आझाद हिंद संघटनेचा इशारा; महामार्ग प्राधिकरणाला निवेदन
Dhule, Dhule | Dec 1, 2025 धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरात होणाऱ्या नव्या पुलामुळे प्रभाग १९ मधील सुलतानिया मदरसा, साहिल हॉटेल व १०० फुटी रोड परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आझाद हिंद संघटनेने NHAI अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून निवेदन दिले. स्वतंत्र चौफुलीची मागणी तसेच वडजाई रोड पुलाखालील खड्डे तात्काळ भरावेत, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.