दौंड: दौंड पोलिसांचा अवैध दारूविक्रीवर तीन ठिकाणी छापा; गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त, तीन आरोपी जेरबंद..
Daund, Pune | Nov 15, 2025 दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रीला आळा बसावा यासाठी दौंड पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. याप्रकरणी तिघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हे दाखल करून 2 हजार 300 रुपयांचा गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करण्यात आला.