गोंदिया: कारसह ११.३८ लाखांची दारू जप्त,
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई: बाम्हणी रेल्वे गेटवर पकडले
Gondiya, Gondia | Dec 23, 2025 सन २०२५ च्या निरोपानिमित्त व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू तस्करीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला गती दिली आहे. याच अनुषंगाने आमगाव तालुक्यातील बाम्हणी रेल्वे फाटकाजवळ करण्यात आलेल्या कारवाईत २.८० लाख रुपयांची विदेशी दारू व ८.५० लाख रुपये किमतीची कार असा एकूण ११ लाख ३२ हजार १०८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई २१ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली.