पारोळा: छानणीच्या दिवशी पाच नगराध्यक्ष तर 131 नगरसेवकांचे अर्ज पात्र, तीन नगराध्यक्षपदाचे तर 24 नगरसेवक पदाचे अर्ज अपात्र
Parola, Jalgaon | Nov 18, 2025 नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात पाच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वैध तर 131 नगरसेवक पदाचे उमेदवार वैध ठरले असून नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवारी अर्ज अपात्र तर नगरसेवक पदाचे 24 उमेदवारांचे अर्ज विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आले.