काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला - भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची मुंबईत प्रतिक्रिया
काँग्रेसचा महिलाविरोधी खरा चेहरा पाहू या त्यासाठी आधी त्यांचा महिला विरोधी बुरखा फाडू या काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या वडपल्लीवार याने एक उचापत करून ठेवली आहे. आपल्या लाडकी बहीण योजने विरोधात महाशयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसनं आपल्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती, तेव्हा कोर्टानं त्यांचं थोबाड फोडलं होतं काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे. अशी टीका आज ६ वाजता मुंबईत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.