सिरोंचा: सिरोंचा येथे सफाई कामगार युनियनची बैठक; किमान वेतन, कामाचे तास निश्चित करण्यासह सुरक्षेची मागणी
सिरोंचा शहरातील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगार युनियन संलग्न आयटक (AITUC) ची एक महत्त्वाची बैठक नुकतीच सिरोंचा येथे पार पडली. या बैठकीत कामगारांच्या किमान वेतन, निश्चित कामाचे तास आणि सुरक्षा साधनांच्या मागणीवर भर देण्यात आला. आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार आणि आयटकचे कॉ. सुरज जककुलवार यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.