गोंदिया: मुंबई येथे रोजगार हमी निधी वाटप संदर्भात रोजगार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी आमदार विनोद अग्रवाल याची विस्तृत चर्चा
मंत्रालय, मुंबई येथे रोजगार हमीच्या निधी वाटप संदर्भात रोजगार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सोबत विस्तृत चर्चा झाली. यावेळी आमदार विनोद अग्रवाल आमदार, विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम उपस्थित होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल कामाचे निधी वितरणामध्ये मराठवाडा विभागाला 65 टक्के पेक्षा जास्त व व पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना दहा ते पंधरा टक्के निधी व गोंदिया जिल्ह्याला 0% निधी वितरण करण्यात आलेल्या अन्यायकारक शासन निर्णयाला तातडीने स्थगिती देण्याबाबत चर्चा करण्यात आली.