नांदुरा: नगर परिषद निवडणूक भाजप,आघाडी व अपक्ष अशी होणार तिरंगी लढत
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीतील लढतीचे चित्र २१ नोव्हेंबर रोजी पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.यात नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या मंगला सुधीर मुन्हेकर, अकोट विकास आघाडीतर्फे संतोषी महेश चांडक तर अपक्षापैकी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती (लाला) इंगळे यांच्या पत्नी रेखा निवृत्ती इंगळे यांच्यात खऱ्याअर्थी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे.दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी ९ तर नगरसेवक पदासाठी १३३ उमेदवार रिंगणात आहेत.