मुलीच्या लग्नासाठी जमवलेले २ लाख ५८ हजार ६०० रुपयांचे दागिने आणि ३ लाख ६० हजार रोख रक्कम असा ६ लाख १८ हजार ६०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरात घुसून लंपास केला. ही घटना सोमवारी (दि. २) दुपारी दोन वाजता लासूर स्टेशन येथील शक्करभाई मोहल्ल्यात घडली.