नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अनेक नगर परिषदांवर आपला ध्वज फडकवत बाजी मारली आहे. वणी नगर परिषद येथे भारतीय जनता पक्षाचे १८ नगर सेवकांसह नगराध्यक्ष पदी सौ. विद्याताई आत्राम यांनी बाजी मारली. त्या अनुषंगाने सौ. विद्याताई यांनी आज भाजप नेते नितीन भुतडा यांच्या उमरखेड येथील निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.