हदेवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास प्रभाग क्रमांक १ ते ५ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप झाल्यानंतर दोन गट समोरासमोर आले. या वादाचे क्षणात राड्यात रूपांतर झाले असून मतदान केंद्र परिसरात मोठा तणाव निर्माण झाली होता.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यानी घटनास्थळी धाव दाखल झाले होते.