पुणे शहर: सांगवी परिसरात कार चालकाने श्वनाला उडवले, कार चालकविरोधात गुन्हा दाखल
पुण्यात पिंपरी चिंचवड परिसरात रस्त्याच्या कडेला बसलेल्या श्वानाच्या अंगावर एका चालकाने कार घातल्याने तो श्वान यात गंभीर जखमी झाला आहे. सांगवी परिसरात ही घटना घडली आहे. नितीन ढावळे असे कार चालकाचे नावं असून याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल भारत कामत यांनी सांगवी पोलिसांत फिर्याद दिली. ही घटना सोमवारी (दि. ३०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.