रेल्वे स्टेशन परिसरातून रांजणगाव शेणूकडे निघालेल्या एका रिक्षाचा अहिल्यानगर रोडवरील गोळवाडी फाट्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला रिक्षाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी पहाटे 1.30 ते 1.55 वाजण्याच्या सुमारास घडली.